रात्री ओएबी चे नियोजन  करण्यासाठी सूचना ( Overactive Bladder )

  Overactive Bladder (OAB)

या आजारात पेशंटला त्याचे  व्यक्तीगत आयुष्य प्रभावित होण्याइतपत पुन्हा पुन्हा लघवी करावीशी वाटते. ही वारंवार लघवी साठी जाण्याची शक्यता दिवसा, रात्री किंवा दोन्ही वेळा असू शकते. जर यात मूत्राशयाचा ताबा जात असेल तर त्याला urge Incontinence म्हणतात. 40% पेक्षा जास्त पेशंट मध्ये हे दिसून येते.

 

रात्री ओएबी चे नियोजन  करण्यासाठी सूचना 

 

  1. शांत झोप लागावी यासाठी प्रयत्न करा:संध्याकाळी 6 वाजल्यानंतर द्रव पदार्थ कमी प्रमाणात प्या, त्यामुळे झोपण्याच्या वेळेस तुमचे मूत्राशय रिकामे राहील.

 

  1. झोपण्याचे वेळी अचानक लघवी होईल याची चिंता वाटतेय? संरक्षक पॅडचा उपयोग केलात तर तुम्हाला बरे वाटेल.

 

 

  1. अचानक बाथरूमला जावे लागू नये म्हणून, तुमच्या आहारातून कॅफीनला काढून टाकण्याचा प्रयत्न करा.

 

  1. कामानंतर एखादे ड्रिंक घेतल्याने चांगले वाटू शकेल, परंतु अल्कोहोलमुळे ओएबी ची लक्षणे वाढण्याची शक्यता असते – ज्यामुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकेल. मद्यपान कमी करण्याची वेळ आली आहे हे समजा.

 

  1. जर डाययुरेटिक्ससारख्या औषधांमुळे तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात लघवी निर्माण होत असेल तर अशी औषधे रात्री झोपण्यापूर्वी घेण्याऐवजी सकाळी घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या डॉक्टरांशीयाबद्दल बोला.

 

  1. तुमच्या मूत्राशयाची ताकद वाढवण्यासाठी पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस करा.

 

  1. तुमच्या मूत्राशयावरील दाब कमी करण्यासाठी तुमचे वजन कमी करा.

 

  1. आज रात्री थोडे आरामशीर झोपा : झोपण्यापूर्वी बाथरूममध्ये घाई न करता बराच वेळ थांबून तुम्ही मूत्राशय संपूर्णपणे रिकामे केलेले आहेत याची खात्री करून घ्या.

 

  1. रात्री मध्येच उठून बाथरूमला जाऊन आल्यानंतर पुन्हा झोप लागत नाही? तसे झाले तर बिछान्यात नुसतेच न तळमळत न राहता उठा आणि तुम्हाला पुन्हा झोप आल्यासारखे वाटेपर्यंत काहीतरी करा.

 

  1. जर ओएबीमुळे तुम्हाला लागोपाठकाही रात्री जागे राहावे लागत असेल, तर मदत घ्या. तुमच्या डॉक्टरांशी याबद्दल बोला.

 

अधिक माहिती साठी संपर्क करा डॉ . लोमेश  कापडणीस  यूरोलॉजिस्ट  इन नाशिक  (Urologist in Nashik). : https://siddhidataclinic.com

 

Share this post